अर्थ मंत्रालय
औद्योगिक क्षेत्रात 9.5 टक्क्याने वाढ
‘आऊटपुट’च्या एकूण मूल्यापैकी 47.5 टक्के हे उत्पादनात्मक उपक्रमांमध्ये ‘इनपुट’ म्हणून वापरले गेले
Posted On:
22 JUL 2024 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2024
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2023-24 चे मुख्य आकर्षण म्हणजे 9.5 टक्क्याने झालेली मजबूत औद्योगिक वाढ.
आर्थिक सर्वेक्षणानुसार, उत्पादन क्षेत्र हे भारतीय औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य क्षेत्रांपैकी एक आहे, ज्याने गेल्या दशकात सरासरी वार्षिक 5.2 टक्के वाढीचा दर गाठला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये या क्षेत्राचे एकूण मूल्यवर्धन हे 14.3 टक्के होते आणि त्याच कालावधीत उत्पादनातील वाटा 35.2 टक्के इतका होता, हे या क्षेत्रामध्ये मागील आणि भविष्यातील लक्षणीय संबंध असल्याचे दर्शविते. हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (एचएसबीसी) इंडिया खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) देखील उत्पादनासाठी आर्थिक वर्ष 2024 च्या सर्व महिन्यांसाठी 50 च्या जवळपास मूल्यावर स्थिर होता आणि हीच गोष्ट भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या निरंतर होणाऱ्या विस्तार आणि त्याच्या स्थिरतेचा दाखला आहे.
सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, देशातील उत्पादनाच्या एकूण ‘आऊटपुट’ मूल्यापैकी सुमारे 47.5 टक्के उत्पादनात्मक उपक्रमांमध्ये (आंतर-उद्योग वापर) ‘इनपुट’ म्हणून वापरला जातो. आंतर-उद्योग वापरामध्ये उत्पादन उपक्रमांचा वाटा सुमारे 50 टक्के आहे आणि सर्व उत्पादक उपक्रमांमध्ये (शेती, उद्योग आणि सेवा) सुमारे 50 टक्के इनपुट पुरवठा देखील करतात.
भौतिक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि अनुपालनातील अडथळ्यांमुळे भूतकाळात क्षमता निर्मिती आणि विस्तार कमी झाला होता; परंतु यातील बहुतांश निर्बंध आता उठवण्यात आले आहेत,असे हे सर्वेक्षण आशावादीपणे नमूद करते. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, भौतिक पायाभूत सुविधा आणि संपर्क वेगाने सुधारत आहे, तसेच वस्तू आणि सेवा कराने अनेक वस्तूंसाठी एकच बाजारपेठ निर्माण केली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सक्षम झाले आहे. सर्वेक्षण दीर्घकालीन गुंतवणुकीत खाजगी क्षेत्राच्या भूमिकेसह नियंत्रणमुक्तीचे महत्त्व अधोरेखित करते. स्पर्धात्मकता वाढवणे आणि भारतीय उत्पादन क्षेत्राचा विस्तार करणे ही अर्ध-कुशल रोजगार निर्मितीची गुरुकिल्ली आहे ज्यामुळे अधिक विकास लोकांपर्यंत पोहोचू शकेल.
S.Pophale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2035224)
Visitor Counter : 85
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam