पंतप्रधान कार्यालय
पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2024 4:45PM by PIB Mumbai
पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पुजारी यांनी कृषी क्षेत्रात, विशेषत: सेंद्रिय शेती पद्धतींना चालना देण्यासाठी आणि स्वदेशी बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“श्रीमती कमला पुजारी’जी यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांनी कृषी क्षेत्रात, विशेषत: सेंद्रिय शेती पद्धतींना चालना देणे आणि देशी वाणांच्या बियाण्यांचे संरक्षण करणे, यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शाश्वतता, समृद्धी आणि जैवविविधतेचे रक्षण करण्याचे त्यांचे कार्य वर्षानुवर्षे स्मरणात राहील. त्या आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाच्या मार्गावरच्या दिशादर्शक दीपक होत्या. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रति माझी सहवेदना. ओम शांती.”
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034643)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam