पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी डॉ.आर बालसुब्रमण्यम यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर केली स्वाक्षरी
Posted On:
17 JUL 2024 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी भेट घेतली आणि त्यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचे वर्णन केले असून पाश्चात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून त्याचा अर्थ सांगितला आहे. तसेच या दोन्हींचा समावेश करून सार्वजनिक सेवेसाठी जीवन समर्पित करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी या पुस्तकात एक मार्गदर्शक आराखडा प्रदान केला आहे.
डॉ आर बालसुब्रमण्यम यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले:
“आज डॉ आर बालसुब्रमण्यम यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांच्या पुस्तकाच्या एका प्रतीवर स्वाक्षरीही केली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2033909)
अभ्यागत कक्ष : 138
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam