पंतप्रधान कार्यालय
हुल दिनानिमित्त पंतप्रधानांनी आदिवासी वीरांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2024 2:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धो-कान्हू, चांद-भैरव आणि फुलो-झानो या आदिवासी वीरांना त्यांच्या स्वाभिमान जपल्याबद्दल आणि ब्रिटीश साम्राज्याच्या अत्याचाराविरुद्ध दाखवलेल्या शौर्याबद्दल आदरांजली वाहिली आहे. मोदी म्हणाले की हुल दिवस हा आपल्या आदिवासी समाजाच्या अतुलनीय धैर्य, संघर्ष आणि बलिदानाला समर्पित करण्यासाठीचा महान दिवस आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
"हुल दिवस हा आपल्या आदिवासी समाजाच्या अतुलनीय धैर्याला, संघर्षाला आणि बलिदानाला समर्पित केलेला एक महान दिन आहे. या पवित्र दिनी सिद्धो-कान्हू, चांद-भैरव आणि फुलो-झानो यांसारख्या आदिवासी वीर-वीरांगनांना माझी विनम्र श्रद्धांजली. "ब्रिटिश साम्राज्याच्या अत्याचारांविरुद्ध त्यांच्या स्वाभिमानाच्या आणि शौर्याच्या कहाण्या देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील."
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2029724)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam