पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 30 JUN 2024 2:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीद्वारे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुरुषांच्या टी20 विश्वचषक  विजयाबद्दल अभिनंदन केले.  या स्पर्धेत संघातील खेळाडूंनी  दाखवलेल्या अनुकरणीय कौशल्याचे आणि संघ भावनेचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी  एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले:

भारतीय क्रिकेट संघाशी संवाद साधला आणि टी20 विश्वचषकातील त्यांच्या अतुलनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य आणि उत्साह दाखवला. प्रत्येक खेळाडूची  बांधिलकी  प्रेरणादायी आहे .

पंतप्रधानांनी  संघाचा कर्णधार रोहित शर्मा,अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि संघाचे  प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांच्या वचनबद्धतेसाठी स्वतंत्र  पोस्ट लिहिल्या.

"प्रिय @ImRo45,

तुम्ही उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाचे धनी आहात. तुमची आक्रमक मानसिकता, फलंदाजी आणि कप्तानी  यामुळे भारतीय संघाला नवा आयाम मिळाला आहे. तुमची टी20 कारकीर्द कायम लक्षात राहील. आज पहाटे तुमच्याशी बोलून आनंद झाला.

प्रिय @imVkohli,

तुमच्याशी बोलून आनंद झाला. अंतिम सामन्यातील तुमच्या डावाप्रमाणेच तुम्ही नेहमीच भारतीय फलंदाजीला भक्कम आधार दिला आहे.  तुम्ही या खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टी20 क्रिकेटला तुमची आठवण येईल हे नक्कीच. पण मला विश्वास आहे की तुम्ही नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत राहाल.

"राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक म्हणून अतुलनीय अशा प्रवासाने भारतीय क्रिकेटच्या यशाला आकार दिला आहे.

त्याचे अतूट समर्पण, धोरणात्मक अंतर्दृष्टी आणि योग्य प्रतिभेची जोपासना  यामुळे संघाचा कायापालट झाला आहे.

त्यांच्या योगदानाबद्दल आणि पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी भारत त्यांचा आभारी आहे. त्यांना विश्वचषक उंचावतांना बघून आनंद झाला. तसेच त्यांचे अभिनंदन करून खूप आनंद झाला."

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2029715) आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam