अर्थ मंत्रालय

निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री पदाचा स्वीकारला पदभार


सरकार आपल्या नागरिकांसाठी 'इज ऑफ लिव्हिंग’ सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि या दिशेने पुढील पाऊले उचलत राहील, - केंद्रीय वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन.

Posted On: 12 JUN 2024 10:14AM by PIB Mumbai

निर्मला सीतारामन यांनीआज नवी दिल्लीत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री पदाचा  पदभार स्वीकारला.

वित्त सचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन आणि वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या इतर सचिवांनी नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात सीतारामन यांचे स्वागत केले.

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून पुन्हा काम करण्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत आणि तेथील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
सीतारामन यांनी गेल्या 10 वर्षांतील भक्कम नेतृत्व आणि विकासाभिमुख शासनाची कबुली देऊन विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनशील बदल घडवून आणले आणि एक मजबूत आणि लवचिक अर्थव्यवस्था निर्माण केल्याचे नमूद केले.
पदभार स्वीकारल्यानंतर, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या विविध विभागांच्या सचिवांनी चालू असलेल्या धोरणात्मक मुद्द्यांवर केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांना माहिती दिली.
त्यांनी नमूद केले की, सरकार आपल्या नागरिकांसाठी ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि या संदर्भात पुढील पावले उचलत राहील.
निर्मला सीतारामन यांनी असेही सांगितले की, “2014 पासून करण्यात आलेल्या सुधारणा पुढे चालू राहतील, ज्यामुळे भारतासाठी व्यापक आर्थिक स्थिरता आणि वाढ होईल.  त्यांनी जागतिक आव्हानांमध्ये अलीकडच्या काळात भारताच्या प्रशंसनीय विकासावर प्रकाश टाकला आणि आगामी वर्षांसाठी आशावादी आर्थिक दृष्टिकोन असल्याचे नमूद केले.
त्यांनी सर्व विभागांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विकासाचे धोरण नव्या जोमाने पुढे नेण्याचे आणि पंतप्रधानांचे 'विकसित भारत'चे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रतिसादात्मक धोरण निश्चित करण्याचे आवाहन केले.
सरकारचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ वर विश्वास असल्याचे केंद्रीय वित्त मंत्र्यांनी सांगितले आणि मजबूत  अर्थव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी उद्योगातील प्रमुख नियामक आणि नागरिकांसह सर्व भागधारकांना सतत समर्थन आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.

***

NM/GajendraD/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2024635) Visitor Counter : 50