पंतप्रधान कार्यालय

भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांना जागतिक नेत्यांकडून अभिनंदनपर संदेशांचा ओघ सुरूच


अभिनंदन संदेश पाठवल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून जागतिक नेत्यांचे आभार

Posted On: 11 JUN 2024 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2024

देशाच्या पंतप्रधानपदाचा तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर आलेल्या अभिनंदनाच्या संदेशांबद्दल आणि दूरध्वनीवरून संपर्काबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत. मोदी यांनी या संदेशांना एक्स या समाजमाध्यवावर प्रतिसाद दिला आहे.

क्युबा प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डायझ-कॅनेल बर्मुडेझ यांच्या संदेशाला पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद ;

अध्यक्ष डायझ-कॅनेल तुम्ही  मनापासून दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी कृतज्ञ आहे. क्युबासोबतचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, या संबंधाचे मूळ अनेक शतके जुन्या उभय देशांमधील लोकांमधील थेट संवादाने जोडले गेले आहे.

पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना यांच्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

अध्यक्ष सँटियागो पेना तुमच्या शुभेच्छांचे मी स्वागत करतो.लोकांच्या हितासाठी आम्ही भारत-पॅराग्वे संबंध यापुढेही वृद्धिंगत करू  .

पनामाचे अध्यक्ष लॉरेंटिनो कॉर्टिझो यांना उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

धन्यवाद अध्यक्ष निटो कॉर्टिझो.पनामा हा प्रमुख भागीदार आहे. परस्पर हिताची भागीदारी सर्व बाजूंनी अधिक मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम करू.

बल्गेरियाचे अध्यक्ष  रुमेन रादेव यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

धन्यवाद अध्यक्ष रुमेन रादेव.भारत आणि बल्गेरिया यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करत राहू.

ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संवादाबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले;

ओमानचे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद.त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि मैत्रीच्या शब्दांचे मनापासून कौतुक.शतकानुशतके असलेले भारत-ओमान यांच्यातील धोरणात्मक संबंध नक्कीच नवीन उंचीवर पोहचतील.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2024355) Visitor Counter : 49