नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्वीकारला बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचा कार्यभार

Posted On: 11 JUN 2024 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2024


केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी  नवी दिल्लीत 10 जून रोजी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.  देशातील नागरिकांची सेवा करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सज्ज होण्याचा दृढविश्वास त्यांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केला. विकसित भारताच्या संकल्प पूर्तीच्या दिशेने कार्य करताना राष्ट्राची सेवा करण्याची आपली वचनबद्धता निरपेक्ष असावी याचा पुनरुच्चार करत सोनोवाल यांनी उत्तम कार्य निरंतर सुरु ठेवण्याचे आवाहन केले.

नौवहन क्षेत्र एक आर्थिक महाशक्ती म्हणून उदयाला यावं आणि त्याचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चैतन्यदायी नेतृत्वाखाली बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. विकसित भारताचे आपले अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेने राष्ट्र उभारणीचे कार्य आम्ही पुढेही असेच कायम ठेवू, असे ते यावेळी म्हणाले. सागरी अमृतकाळ दृष्टिकोन 2047 मध्ये केलेल्या संकल्पानुसार आमचे मंत्रालय सागरी क्षेत्राचे सक्षमीकरण आणि त्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने कार्य करत राहील, असे सोनोवाल यांनी सांगितले.

आपल्यावर  विश्वास दाखवून पुन्हा एकदा बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचा कार्यभार सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

गेल्या दहा वर्षात आपल्या बंदरांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत कार्यक्षमता आणि क्षमताबांधणी यामध्ये ऐतिहासिक यश प्राप्त करत  एक उदयोन्मुख क्षेत्र म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या नवीन सरकार मध्ये, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सागरी अमृत काळ दृष्टिकोन 2047 प्रत्यक्षात साकारण्यासह नौवहन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय पुढे मार्गक्रमण करेल.


Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 2024198) Visitor Counter : 71