सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
डॉ. वीरेंद्र कुमार यांनी स्वीकारला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रीपदाचा कार्यभार
रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रीपदी आज डॉ वीरेंद्र कुमार यांनी पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपवल्याबद्दल कुमार यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी राज्यमंत्री रामदास आठवले, बी.एल.वर्मा यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर डॉ. कुमार यांनी आठवले आणि वर्मा यांच्यासह मंत्रालयाची आतापर्यंतची कामगिरी आणि विकसित भारताच्या संकल्पाच्या संदर्भात भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा केली.
रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री म्हणून सूत्रं हातात घेतली.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यरत राहू असे यावेळी आठवले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024185)
आगंतुक पटल : 110
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam