सांस्कृतिक मंत्रालय
गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वीकारला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रीपदाचा कार्यभार
आपल्या देशाची वाढती शक्ती आपल्या समृद्ध सांस्कृतिक जडणघडणीत आहे: शेखावत
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 4:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल तसेच आपल्या देशात आणि जगभरात भारतीयतेचे जतन , संरक्षण आणि संवर्धन करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेखावत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

इंडिया ते भारत अशा स्थित्यंतराच्या काळात, पंतप्रधान मोदी यांनी वसाहतवादाच्या जोखडातून आपल्याला मुक्त करून आपला गौरवशाली वारसा पुनर्स्थापित करण्यासाठी अनेक पावलं उचलल्याचं मत शेखावत यांनी व्यक्त केलं. आपल्या देशाची वाढती ताकद आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशात आहे आणि कला, संगीत, नृत्य, वस्त्रे या माध्यमातून ती प्रगट होत असते, असे ते म्हणाले. या अमृतकाळात आपली शक्ती वाढवण्यासाठी एकत्र काम करुया आणि विकसित भारतासाठी आपल्या संस्कृतीला या अमृत काळात बळकट करूया आणि विकसित भारत घडवण्यासाठी एक मजबूत माध्यम बनवूया असेही शेखावत म्हणाले.

सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेखावत यांचे स्वागत केले.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024132)
आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam