कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
"गेल्या 10 वर्षांमध्ये पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली क्रांतीकारी प्रशासन सुधारणा झाल्या आणि या कार्यकाळातही त्या सुरू राहतील" डॉ. जितेंद्र सिंह यांचे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केले प्रतिपादन
आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याबद्दल आणि सलग तिसऱ्यांदा ही जबाबदारी दिल्याबद्दल डॉ.जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार
Posted On:
11 JUN 2024 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
डॉ.जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक मध्ये आज सकाळी 10 वाजता कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला.पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, "गेल्या 10 वर्षांमध्ये पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली क्रांतीकारी प्रशासकीय सुधारणा झाल्या आणि या कार्यकाळात ही त्या सुरू राहतील."
डॉ.जितेंद्र सिंह यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून आज पदभार स्वीकारला.
आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल आणि सलग तिसऱ्यांदा ही जबाबदारी दिल्याबद्दल डॉ.जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. डॉ. सिंह यांच्याकडे 2014 पासून हे खाते आहे. ते उधमपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, “ विकसित भारत मोहीम पूर्ण होईपर्यंत या सुधारणा सुरूच राहतील. “ ते पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून केलेल्या कामामध्ये यापुढेही हे सातत्य राहील. डॉ. जितेंद्र सिंह यांनी डीओपीटीच्या कामगिरीला अधोरेखित करतांना सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षातील प्रशासन सुधारणा पथदर्शक आहेत आणि किमान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासनाच्या भावनेने प्रेरित आहेत.देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी नागरिक केंद्री धोरणात वाढ करणे, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी पेन्शन, विविध सरकारी विभागांच्या कामकाजातील नियम आणि नियमांमध्ये सुधारणा, निवडीसाठी मुलाखत प्रक्रिया रद्द करणे, दुर्गम भागातील उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देणे आणि जुने नियम काढून टाकणे यासारख्या सुधारणांवरही त्यांनी भाष्य केले. डॉ. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, प्रशासकीय सुधारणा आणि ऐतिहासिक कर्मयोगी मोहीम या गेल्या दोन कार्यकाळामध्ये केलेल्या काही क्रांतिकारी सुधारणा आहेत. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की सीपीजीआरएएमएस हे जगभरातील सार्वजनिक तक्रार निवारणासाठी एक आदर्श आहे.
त्यांनी जेव्हा केंद्रीय मंत्री चा पदभार स्वीकारला तेव्हा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, सचिव, व्ही. श्रीनिवास आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, सचिव, एस. राधा चौहान यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते
Jaydevi PS/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024027)
Visitor Counter : 68
Read this release in:
Kannada
,
English
,
Manipuri
,
Urdu
,
Hindi_MP
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam