राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 07 JUN 2024 7:48PM by PIB Mumbai

 

भारतीय जनता पार्टी (भाजप) चे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या शिष्टमंडळाने आज दुपारी 2.30 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याचे पत्र सुपूर्द केले. एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आली. शिष्टमंडळातील इतर सदस्यात भाजपचे राजनाथ सिंह, अमित शहा, अश्विनी वैष्णव आणि डॉ. सी.एन. मंजुनाथ; तेलुगु देसम पक्षाचे एन. चंद्राबाबू नायडू; जनता दल (संयुक्त) चे नितीश कुमार, राजीव रंजन सिंग (ललन सिंग) आणि संजय झा; शिवसेनेचे एकनाथ शिंदे; जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे एच.डी. कुमारस्वामी; लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे चिराग पासवान; हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) चे जीतन राम मांझी; जनसेने चे पवन कल्याण; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार; अपना दल (सोनेयलाल) च्या अनुप्रिया पटेल; राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी; युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल चे जोयंता बसुमतारी; असम गण परिषदेचे अतुल बोरा; सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे इंद्र हँग सुब्बा; ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे सुदेश महतो आणि चंद्र प्रकाश चौधरी; आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे रामदास आठवले यांचा समावेश होता.

मिळालेल्या पाठिंब्याच्या विविध पत्रांच्या आधारे निवडणूकपूर्व काळातील सर्वात मोठी आघाडी असलेली भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी, नव्याने स्थापन झालेल्या 18व्या लोकसभेत बहुमताने पाठींबा  प्राप्त करण्याच्या आणि  एक स्थिर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचे नोंदवत  आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75(1) नुसार त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून नरेंद्र मोदी यांची भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.

राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ सूचित करण्याची विनंती केली आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या इतर व्यक्तींच्या नावांबाबतही अवगत करण्यास सांगितले.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023541) Visitor Counter : 86