पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल इस्रायलच्या पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन


भारत-इस्रायल संबंध मजबूत करण्यात पंतप्रधान नेतन्याहू यांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी केला उल्लेख

भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या बांधिलकीचा उभय नेत्यांद्वारे पुनरुच्चार

Posted On: 06 JUN 2024 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी आज दूरध्वनीवर त्यांचे अभिनंदन केले.

भारतातील लोकांप्रती असलेल्या त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपुलकीबद्दल त्यांचे आभार मानताना, पंतप्रधानांनी भारत-इस्रायल संबंधांना बळकट करण्यासाठी गेल्या काही वर्षांत त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. .

उभय नेत्यांनी सर्व क्षेत्रात भारत-इस्रायल सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

संपर्कात राहण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली. 

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023333) Visitor Counter : 71