भारतीय निवडणूक आयोग
लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यासाठी 25 मे 2024 रोजी रात्री 11:45 पर्यंत 61.20 % मतदान
Posted On:
25 MAY 2024 11:59PM by PIB Mumbai
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतल्या सहाव्या टप्प्यात 25 मे 2024 रोजी रात्री 11:45 पर्यंत अंदाजे 61.20% मतदान झाले. राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रतिनिधींकडून येत राहिलेल्या माहिती नुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांद्वारे आकडेवारी अद्ययावत होत राहील आणि ती मतदारसंघनिहाय (संबंधित विधानसभा विभागांसह) VTR ॲपवर लाईव्ह उपलब्ध असेल. ही सर्व प्रक्रिया, मतदानाच्या आधीच्या टप्प्याप्रमाणेच असेल.
रात्री 11:45 वाजे पर्यंतचे राज्यनिहाय अंदाजे मतदान खालीलप्रमाणे आहे:
Sl. No.
|
State / UT
|
No. PCs
|
Approximate Voter Turnout %
|
1
|
Bihar
|
08
|
55.24
|
2
|
Haryana
|
10
|
60.4
|
3
|
Jammu and Kashmir
|
01
|
54.30
|
4
|
Jharkhand
|
04
|
63.76
|
5
|
NCT of Delhi
|
07
|
57.67
|
6
|
Odisha
|
06
|
69.56
|
7
|
Uttar Pradesh
|
14
|
54.03
|
8
|
West Bengal
|
08
|
79.47
|
Above 8 States/UTs
|
58
|
61.2
|
इथे जाहीर केलेली माहिती, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणाली मध्ये भरलेल्या माहितीनुसार आहे. कारण काही मतदान केंद्रांमधून तपशील यायला वेळ लागतो आणि त्यात टपाली मतदानाचा समावेश नसल्यामुळे, ही अंदाजे आकडेवारी आहे, प्रत्येक मतदान केंद्रात नोंद झालेल्या मतांचा अंतिम हिशेब अर्ज 17 सी द्वारे सर्व पोलिंग एजंटना (राजकीय पक्षांचे निवडणूक प्रतिनिधी) मतदान संपल्यावर दिला जातो.
***
S.Kane/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021686)
Visitor Counter : 98