Posted On:
24 MAY 2024 2:33PM by PIB Mumbai
लोकसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी भारतीय निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 58 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात हरियाणा आणि दिल्लीच्या एनसीटी मध्येही मतदान होणार आहे. या टप्प्यात बिहार, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात या टप्प्यात मतदान होणार आहे. याच्या सोबतीला, ओदिशा राज्य विधानसभेच्या 42 विधानसभा मतदारसंघांतही मतदान होणार आहे.
हवामान विभागाने ज्या भागांसाठी उष्ण हवामान किंवा पावसाचा अंदाज वर्तवला असेल अशा भागात, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य यंत्रणांनी
प्रतिकूल परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुखकर आणि सुरक्षित वातावरणात मतदान व्हावे यासाठी मतदारांना आवश्यक पुरेशी सावली, पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांसह मतदान केंद्रे सज्ज आहेत. मतदान यंत्रे आणि मतदान साहित्यासह मतदान कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.
मतदारांनी घराबाहेर पडून जबाबदारी समजून घेत, अभिमानाने तसेच मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर मतदान करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. दिल्ली, गुडगाव, फरीदाबाद सारख्या शहरी केंद्रांमधील लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याच्या आणि शहरी उदासीनतेच्या प्रवृत्तीला खंडित करत त्यांचे हक्क आणि कर्तव्याची विशेष आठवण करून दिली जात आहे.
शेवटचा टप्प्यात म्हणजेच मतदानाच्या 7 व्या टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी उरलेल्या 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि 428 लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले.
टप्पा 6 --
1.... 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकींच्या सहाव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 58 संसदीय मतदारसंघांत (सामान्य- 49; अनुसूचित जमाती- 02; अनुसूचित जाती- 07) दिनांक 25 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि मतदान बंद होण्याच्या वेळा विविध संसदीय मतदारसंघांनुसार भिन्न असू शकतात.
2...ओडिशा विधानसभेच्या 42 विधानसभा मतदारसंघांत देखील याच दिवशी मतदान होणार आहे.
3.... सुमारे 11.4 लाख मतदान अधिकारी 1.14 लाख मतदान केंद्रांवर 11.13 कोटी मतदारांचे स्वागत करतील
4....11.13 कोटी मतदारांमध्ये 5.84 कोटी पुरुष मतदारांचा समावेश आहे; 5.29 कोटी महिला आणि 5120 तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे.
5... 8.93 लाख नोंदणीकृत मतदार 85पेक्षा अधिक वर्षे वयाचे, 23659 मतदार 100 वर्षांवरील आणि 9.58 लाख दिव्यांग मतदार आहेत; ज्यांना सहाव्या टप्प्यासाठी घरच्या घरी मतदानाचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे. पर्यायी गृह मतदान सुविधेची आधीपासूनच प्रचंड प्रशंसा होत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
6... सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेआण करण्यासाठी 20 विशेष रेल्वे गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
7...184 निरीक्षक (66 सामान्य निरीक्षक, 35 पोलीस निरीक्षक, 83 व्यय निरीक्षक) मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. आयोगाचे डोळे आणि कान म्हणून अत्यंत दक्ष राहण्याचे कार्य ते करतात. याव्यतिरिक्त, काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.
8.... एकूण 2222 भरारी पथके, 2295 देखरेख पथके , 819 व्हिडिओ देखरेख पथके आणि 569 व्हिडिओ देखरेख पथके चोवीस तास लक्ष ठेवून आहेत; जेणेकरून कोणाही मतदाराला कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले गेल्यास कडक आणि त्वरीत कारवाई केली जाईल .
9....एकूण 257 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके आणि 927 आंतरराज्य सीमा तपासणी नाके मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही प्रकारच्या अवैध वाहतूकीवर कडक नजर ठेवत आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे.
10... वृद्ध आणि दिव्यांग मतदार व्यक्तींना सुलभतेने मतदान करण्याच्या दृष्टीने पाणी, सावली, स्वच्छतागृह , रॅम्प, स्वयंसेवक, चाकाची खुर्ची आणि वीज यांसारख्या किमान सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.
11... सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहिती पावतीचे वाटप करण्यात आले आहे. या पावत्या एक सोयीचे उपाय म्हणून काम करतात आणि मतदान करण्याचे आमंत्रण म्हणूनही काम करतात.
12.... https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकद्वारे मतदार त्यांचे मतदान केंद्र तपशील आणि मतदानाची तारीख तपासू शकतात.
13... मतदान केंद्रांवर ओळख पडताळणीसाठी आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त 12 पर्यायी कागदपत्रे देखील मान्य केली आहेत. मतदार यादीत मतदार नोंदणीकृत असल्यास, यापैकी कोणतेही कागदपत्र दाखवून मतदान करता येते. पर्यायी ओळख दस्तऐवजांसाठी ECI ऑर्डरची लिंक: https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FzBiU51zPFZI5qMtjV1qgjFsi8N4zYcCRaQ2199MM81QYarA39BJWGAJqpL2w0Jta9CSv%2B1yJkuMeCkTzY9fhBvw%3D%3D
14....सहाव्या टप्प्यासाठी संसदीय मतदारसंघनिहाय मतदार प्रेस नोट क्र. 99 दिनांक 23 मे 2024. दुवा : https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FztfbUTpXSxLP8g7dpVrk7%2FYMdYo4qvd6YLkLk2XBNde37
15... लोकसभा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदानाचा डेटा खालील लिंकवर उपलब्ध आहे: https://old.eci.gov.in/files/file/13579-13-pc-wise-voters-turn-out/
16.... मतदान ॲप प्रत्येक टप्प्यातील एकूण अंदाजे मतदान थेट दर्शविते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की टप्पानिहाय/राज्यनिहाय/विधानसभा मतदारसंघ निहाय/लोकसभा मतदारसंघ निहाय मतदानाचा अंदाज डेटा मतदान ॲपवर मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतो.
17... मतदान आकडेवारी - टप्प्यानुसार, राज्यानुसार, संसदीय मतदारसंघनिहाय (त्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील मतदानासह) व्होटर टर्न आउट ॲपवर पाहता येतील जे खालील लिंकवरून डाउनलोड केले जाऊ शकते:
Android: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN&pli=1
iOS: https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882
***
N.Chitale/S.Mukhedkar/S.Patgaokar/P.Kor