भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 889 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

Posted On: 18 MAY 2024 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2024

 

लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 889 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील मतदान स्थगित झालेल्या 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांचाही समावेश आहे.

या टप्प्यातील मतदानासाठी 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 1978 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.  सर्व 07 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी (जम्मू आणि काश्मीरमधील 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील स्थगित मतदान वगळता) 6 व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 06 मे 2024 होती. दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर, 900 उमेदवारी अर्ज वैध आढळून आले. 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते आणि त्यापैकी 21 उमेदवारी अर्ज वैध असल्याचे आढळले.

सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 470 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, त्याखालोखाल हरियाणामध्ये 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये  370 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. झारखंडमधील 8-रांची लोकसभा मतदारसंघात  सर्वाधिक 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्या खालोखाल देशाची राजधानी दिल्ली मधील  2-ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात 69 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.  सहाव्या टप्प्यासाठी सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची सरासरी संख्या 15 आहे.

2024 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे तपशील:

State/UT

Number of

PCs in sixth phase

Nomination

forms received

Valid

candidates after scrutiny

After withdrawal,

final Contesting Candidates

Bihar

8

246

89

86

Haryana

10

370

239

223

Jammu and Kashmir*

1

-

 

20

Jharkhand

4

245

96

93

NCT OF Delhi

7

367

166

162

Odisha

6

130

65

64

Uttar Pradesh

14

470

164

162

West Bengal

8

150

81

79

Total

58

1978

900

889

*जम्मू-काश्मीरच्या 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात स्थगित करण्यात आलेले मतदान आता सहाव्या टप्प्यात होत आहे. 

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021016) Visitor Counter : 191