भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

लोकसभा निवडणूक 2024च्या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेली 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


चौथ्या टप्प्यासाठी 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा मतदारसंघांसाठी 4264 उमेदवारी अर्ज दाखल

Posted On: 03 MAY 2024 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2024

 

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेली 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 1717 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे, यासाठी एकूण 4264 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. चौथ्या टप्प्यासाठी ही सर्व 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 होती. दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी केल्यानंतर 1970 उमेदवारी अर्ज वैध ठरले.

चौथ्या टप्प्यात तेलंगणातील 17 लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 1488 उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्याखालोखाल आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा मतदारसंघांसाठी 1103 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तेलंगणातील 7 - मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक 177 उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्या खालोखाल याच राज्यातील 13 - नलगोंडा आणि 14 - भोंगीर या दोन्ही मतदारसंघांसाठी प्रत्येकी 114 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. चौथ्या टप्प्यासाठी लोकसभा मतदारसंघांकरता सरासरी 18 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील :

 राज्य / केंद्रशासित प्रदेश

चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्या

प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्या

छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या

अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची अंतिम संख्या

आंध्र प्रदेश

25

1103

503

454

बिहार

5

145

56

55

जम्मू-काश्मीर

1

39

29

24

झारखंड

4

144

47

45

मध्य प्रदेश

8

154

90

74

महाराष्ट्र

11

618

369

298

ओडिशा

4

75

38

37

तेलंगणा

17

1488

625

525

उत्तर प्रदेश

13

360

138

130

पश्चिम बंगाल

8

138

75

75

एकुण

96

4264

1970

1717 

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019559) Visitor Counter : 270