पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी केली चर्चा


इटलीच्या मुक्ती दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

इटलीमधल्या जी 7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार

धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी केला पुनरुच्चार

परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी केला विचारविनिमय

Posted On: 25 APR 2024 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या मुक्ती दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि इटलीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

इटलीतील पुगलिया येथे जून 2024 मध्ये होणाऱ्या जी 7 शिखर परिषदेच्या संपर्क सत्रांसाठी आमंत्रित केल्याबद्दल  त्यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे आभार मानले. भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात विशेषत: ग्लोबल साऊथला पाठबळ पुरवण्यासह महत्त्वाची फलिते, इटलीच्या अध्यक्षतेखालील जी 7 शिखर परिषदेत पुढे नेण्याच्या दिशेने दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.

N.Chitale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018917) Visitor Counter : 37