पंतप्रधान कार्यालय
भूतानच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय बैठक, भारत आणि भूतान यांच्यात सामंजस्य करारांची देवाणघेवाण
Posted On:
22 MAR 2024 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 22 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिम्पू येथे भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेतली. मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित औपचारिक भोजनाच्या वेळी त्यांनी संवाद साधला. पारो ते थिंपू या संपूर्ण प्रवासात भूतानवासीयांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या. या अभूतपूर्व स्वागताबद्दल पंतप्रधानांनी तोबगे यांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी बहुआयामी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि नवीकरणीय ऊर्जा, कृषी, युवा देवाणघेवाण, पर्यावरण आणि वनीकरण तसेच पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात सामंजस्य तयार केले. भारत आणि भूतानमध्ये दीर्घ काळापासून सर्व स्तरांवर अत्यंत विश्वासाचे, सद्भावनेचे आणि परस्पर सामंजस्याचे वैशिष्ट्यपूर्ण आणि अपवादात्मक संबंध आहेत.
बैठकीपूर्वी दोन देशांत ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ, कृषी अशा विविध क्षेत्रातले अनेक सामंजस्य करार दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाले.
https://bit.ly/3xa8U7y
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2016129)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam