भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यासाठी राजपत्रित अधिसूचना जारी केल्यानंतर आज सकाळी सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात


या टप्प्यात 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल 2024 रोजी होणार मतदान

बिहार वगळता इतर सर्व 20 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 मार्च, 2024; बिहारसाठी ती 28 मार्च, 2024

Posted On: 20 MAR 2024 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. भारतीय निवडणूक आयोगाने आज 21 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा निवडणुका 2024 मध्ये होणाऱ्या 102 लोकसभा मतदारसंघांसाठी राजपत्रित अधिसूचना जारी केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील या मतदारसंघांमध्ये 19.04.2024 रोजी मतदान होईल.

पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या राज्य/ केन्द्र शासित प्रदेशांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक खाली दिले आहे.

 

 

 

 

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015791) Visitor Counter : 235