कृषी मंत्रालय

भारतीय कृषी संशोधन परिषद आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 20 MAR 2024 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे.भारतीय‌ कृषी संशोधन परिषदेचे(ICAR)उपमहासंचालक (कृषी विस्तार), डॉ. यू.एस. गौतम आणि धनुका ऍग्रीटेक लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. आर.जी. अग्रवाल यांनी काल संबंधित संस्थांच्या वतीने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या कराराचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी दोन्ही संस्थांच्या कार्यक्षमतेचा वापर करणे हा आहे,असे डॉ.गौतम यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, की  देशभरात 14.5 कोटीहून अधिक शेतकरी आहेत, त्यापैकी बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. धानुका ऍग्रीटेक लिमिटेड  केंद्रीय संस्था, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (ATARIs) आणि कृषी  विज्ञान केंद्र (KVKs)यांच्या संयुक्त विद्यमाने  या लहान शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येईल.

डॉ.गौतम म्हणाले की, आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देत आहे आणि भारत त्याला अपवाद  नाही, अशा वेळी दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हवामानाला अनुकूल अशा कृषी उत्पादन पद्धतींवर काम करण्याची गरज आहे. बदलत्या वातावरणात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

डॉ.अग्रवाल म्हणाले, की,धानुका ॲग्रीटेक सल्लागार सेवा प्रदान करेल आणि भारतीय‌ कृषी संशोधन परिषद-कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था आणि कृषी विज्ञान केंद्रे यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देईल. यावेळी आयसीएआरचे सहाय्यक महासंचालक, संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि आयसीएआरच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015776) Visitor Counter : 77