भारतीय निवडणूक आयोग
                
                
                
                
                
                    
                    
                        अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                17 MAR 2024 4:28PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                
निवडणूक आयोगाच्या 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रक क्रमांक. ECI/PN/23/2024 नुसार लोकसभा-2024ची सार्वत्रिक निवडणूक आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मतदान 19-4-2024 रोजी आणि मतमोजमी 4-6-2024 रोजी होणार असल्याचे उपरोल्लेखित पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
2.   निवडणूक आयोग भारताच्या राज्यघटनेच्या 172(1) कलम सोबत  कलम 324 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 ने प्रदान केलेल्या अधिकारानुसार अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी निवडणूक घ्यायची आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही विधानसभांचा कार्यकाळ 2-6-2024 रोजी संपत आहे.
3.    ही बाब विचारात घेता निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकात खालील प्रसिद्धी पत्रकानुसार बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
	
		
			| 
			 अनुक्रमांक. 
			 | 
			
			 निवडणूक कार्यक्रम 
			 | 
			
			 सध्याचे वेळापत्रक 
			 | 
			
			 सुधारित वेळापत्रक 
			 | 
		
		
			| 
			 1 
			 | 
			
			 मतमोजणीची तारीख 
			 | 
			
			 4 जून, 2024 
			(मंगळवार) 
			 | 
			
			 2 जून 2024 
			 (रविवार) 
			 | 
		
		
			| 
			 2 
			 | 
			
			 निवडणूक ज्यापूर्वी पूर्ण होणार आहे ती तारीख 
			 | 
			
			 6 जून, 2024 
			(गुरुवार) 
			 | 
			
			 2 जून, 2024 
			(रविवार) 
			 | 
		
	
 
 4.       अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2015318)
                Visitor Counter : 208
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam