पंतप्रधान कार्यालय
‘पीएम-सूर्य घरः मोफत वीज योजना’ या योजनेसाठी एक कोटींहून जास्त कुटुंबांची नोंदणी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
16 MAR 2024 9:19AM by PIB Mumbai
‘पीएम-सूर्य घरः मुफ्त बिजली योजना’ या योजनेसाठी एक कोटींहून जास्त कुटुंबांची नोंदणी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
अतिशय आऩंदाची बातमी!
"ही योजना सुरू केल्यापासून सुमारे महिनाभरात एक कोटींहून जास्त कुटुंबांनी स्वतःची ‘पीएम-सूर्य घरः मुफ्त बिजली योजना’ या योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे.
देशाच्या सर्व भागातून नोंदणीचा ओघ सुरू झाला आहे.
आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओदिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश मध्ये पाच लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे.
ज्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नाही, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर नोंदणी करावी.
pmsuryaghar.gov.in"
"या उपक्रमामुळे ऊर्जा उत्पादनासह घरांच्या विजेच्या खर्चात लक्षणीय कपात होण्याची हमी मिळत आहे. यामुळे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायर्नमेंट (लाईफ) या जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल आणि ही पृथ्वी अधिक चांगली बनवण्यात योगदान मिळेल."
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2015158)
Visitor Counter : 167
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam