मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

भारतातून भूतानला पेट्रोलियम, तेल, वंगण (पीओएल) आणि संबंधित उत्पादनांचा सामान्य पुरवठा करण्याबाबत भारत आणि भूतान यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 MAR 2024 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत सरकार आणि भूतानच्या राजेशाही सरकार यांच्यात, भारतातून भूतानला पेट्रोलियम, तेल, वंगण (पीओएल) आणि संबंधित उत्पादनांचा सामान्य पुरवठा करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास मान्यता दिली.

विशेषतः हायड्रोकार्बन क्षेत्रामध्ये, कोणत्याही लिंग, वर्ग किंवा उत्पन्नाच्या भेदभावाशिवाय, भूतानशी चांगल्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंधातून भारत आणि त्याच्या नागरिकांना लाभ पोहोचवणे हा यामागचा उद्देश आहे.

फायदे:

या सामंजस्य करारामुळे हायड्रोकार्बन क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळेल आणि भूतानला पेट्रोलियम उत्पादनांचा सुरक्षित आणि दीर्घकालीन पुरवठ्याची हमी मिळेल.

आत्मनिर्भर भारत साकारण्यात निर्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्या कारणाने, हा सामंजस्य करार आत्मनिर्भर भारताला चालना देईल.

भारताच्या 'शेजारी प्रथम' धोरणातील ऊर्जासेतू म्हणून हा सामंजस्य करार धोरणात्मकदृष्ट्या संयुक्तीक ठरेल.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2014161) Visitor Counter : 87