पंतप्रधान कार्यालय
भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यामधील व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारातून आपली आर्थिक प्रगतीला वेग देण्याची आणि आपल्या युवकांसाठी संधी निर्माण करण्याच्या बाबतीतील वचनबद्धता दिसून येते
Posted On:
10 MAR 2024 8:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्या दरम्यान झालेल्या व्यापाराने आर्थिक भागीदारी कराराचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी या करारावर सही करण्याबद्दलचा त्यांचा संदेशही सामायिक केला.केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे:
“भारत व युरोपियन युनियन मुक्त व्यापार संघटना यांच्यामध्ये झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचा आनंद झाला.या महत्त्वाच्या कराराने आर्थिक प्रगती आणि आपल्या युवकांसाठी संधी निर्माण करण्याच्या बाबतीतली आपली कटीबद्धता अधोरेखित केली आहे. युरोपियन मुक्त व्यापार संघटनेतील देशांबरोबर आपले बंध अधिक दृढ केले तर भावी काळात अधिक समृद्धी आणि परस्पर विकास प्रत्यक्षात येईल."
***
G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013301)
Visitor Counter : 124
Read this release in:
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam