पंतप्रधान कार्यालय
भारतातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
वन्यजीव संरक्षणाप्रति विविध सामुहिक प्रयत्नांचा भाग असलेल्या सर्वांचे केले कौतुक
Posted On:
29 FEB 2024 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 29 फेब्रुवारी 2024
भारतातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, बिबट्यांच्या संख्येत झालेली ही लक्षणीय वाढ म्हणजे जैवविविधतेप्रती भारताच्या अढळ समर्पणभावाचा पुरावा आहे.
वन्यजीव संरक्षणाप्रति विविध सामुहिक प्रयत्नांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांची देखील त्यांनी प्रशंसा केली.
सध्या भारतात 13,874 बिबट्यांची नोंद झाली आहे. वर्ष 2018 मध्ये देशात केवळ 12,852 बिबटे होते.
भारतातील बिबट्यांच्या सद्यस्थितीबाबतच्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आज एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की मध्य भारतात सर्वाधिक प्रमाणात बिबट्यांची नोंद झाली असून मध्य प्रदेशात 3,907 बिबटे आढळून आले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या या संदेशावर प्रतिसाद नोंदवत, पंतप्रधान मोदी म्हणाले;
“सुखद बातमी! बिबट्यांच्या संख्येत झालेली ही लक्षणीय वाढ म्हणजे जैवविविधतेप्रती भारताच्या अढळ समर्पणभावाचा पुरावा आहे. शाश्वत सहअस्तित्वासाठी मार्ग प्रशस्त करत, वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या विविध सामुहिक प्रयत्नांचा भाग असलेल्या सर्वांची मी प्रशंसा करतो.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2010442)
Visitor Counter : 131
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam