पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या, 10 फेब्रुवारी रोजी ‘विकसित भारत, विकसित गुजरात’ कार्यक्रमाला करणार मार्गदर्शन
पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री घरकूल योजना’ तसेच इतर गृहनिर्माण योजनांच्या अंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या 1.3 लाखांहून अधिक घरांचे होणार उद्घाटन आणि भूमिपूजन
Posted On:
09 FEB 2024 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत, विकसित गुजरात’ कार्यक्रमाला संबोधित करतील. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री घरकूल योजना (पीएमएवाय) तसेच इतर गृहनिर्माण योजनांच्या अंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या 1.3 लाखांहून अधिक घरांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे.
गुजरात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 180 हून अधिक ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रम बनासकांठा जिल्ह्यात होणार आहे. संपूर्ण राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गृहनिर्माण योजनांसह विविध सरकारी योजनांचे हजारो लाभार्थी सहभागी होणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील इतर मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी सहभागी या कार्यक्रमात होणार आहेत.
* * *
S.Bedekar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004669)
Visitor Counter : 83
Read this release in:
Kannada
,
Telugu
,
Bengali-TR
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam