पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओ. एन. जी. सी. संस्थेच्या एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 06 FEB 2024 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील ओ. एन. जी. सी. संस्थेच्या एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले. पाण्याखालील बचावकार्यांची माहिती आणि प्रशिक्षण केंद्राची प्रात्यक्षिके देखील पंतप्रधानांनी यावेळी पाहिली.

पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे:

"गोव्यातील ओ. एन. जी. सी. चे सागरी बचाव केन्द्र राष्ट्राला समर्पित करताना आनंद होत आहे. हे अत्याधुनिक केंद्र सागरी बचाव प्रशिक्षण परिसंस्थेत आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने भारतासाठी एक महत्वाचा क्षण आहे. कठोर आणि तीव्र आपत्कालीन प्रतिसाद प्रशिक्षण प्रदान केल्याने अनेकांचे जीव वेळीच वाचवता येतील याची खातरजमा करता येईल".

पंतप्रधानांनी आधुनिक सागरी बचाव केन्द्राची गरज अधोरेखित करणारी एक चित्रफीत देखील सामायिक  केली आणि ते म्हणाले, "म्हणूनच आम्हाला आधुनिक सागरी बचाव केन्द्राची गरज होती आणि ते आपल्या देशासाठी खूप फायदेशीर ठरेल".

पंतप्रधानांसमवेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय पेट्रोलियम, तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

ओ. एन. जी. सी. चे सागरी बचाव केन्द्र

ओ. एन. जी. सी. चे सागरी बचाव केन्द्र हे भारतीय सागरी बचाव प्रशिक्षण परिसंस्थेला जागतिक मानकांपर्यंत नेण्यासाठी एक विलक्षण असे एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केले आहे. येथे दरवर्षी 10,000-15,000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. टोकाच्या हवामान स्थितीतील प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थींची सागरी कौशल्ये वाढवतील आणि अशा प्रकारे वास्तविक जीवनातील आपत्तींपासून सुरक्षित बचावाती शक्यता वाढेल.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2003056) Visitor Counter : 112