अर्थ मंत्रालय
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘अमृत काल’साठी मांडली रणनीती
वेळेवर आणि पुरेसा वित्तपुरवठा, संबंधित तंत्रज्ञान आणि एमएसएमईसाठी योग्य प्रशिक्षण- सरकारसाठी धोरणात्मक प्राधान्य
‘पंचामृत’ उद्दिष्टांच्या धर्तीवर , उच्च आणि अधिक संसाधन-कार्यक्षम आर्थिक वाढ सुलभ करणार ; ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने देखील काम करणार
सरकार सुधारणांचे पुढच्या टप्प्यातील कामे हाती घेणार आणि 'सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन' या मार्गदर्शक मंत्रानुसार राज्ये आणि हितधारकांमध्ये सहमती साधणार
Posted On:
01 FEB 2024 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘अमृत काल’ची रणनीती मांडली. आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणाल्या , “सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) त्यांच्या विकासासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी वेळेवर आणि पुरेसा वित्तपुरवठा, संबंधित तंत्रज्ञान आणि योग्य प्रशिक्षण उपलब्ध करण्याला आमच्या सरकारचे धोरणात्मक प्राधान्य आहे. त्यांच्या वाढीला पूरक नियामक वातावरण उपलब्ध करून देणे हा या धोरणाचा एक महत्त्वाचा घटक असेल.
"पंचामृत' उद्दिष्टांना अनुरुप , उच्च आणि अधिक संसाधन-कार्यक्षम आर्थिक वाढ कायम ठेवण्यात सरकार मदत करेल." असे त्या म्हणाल्या. उपलब्धता, सुगम्यता आणि किफायतशीरपणाच्या दृष्टीने हे ऊर्जा सुरक्षेसाठी उपयुक्त ठरेल असे त्यांनी अधोरेखित केले.
"सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन’ या तत्त्वानुसार सरकार पुढच्या टप्प्यातील सुधारणांची कामे हाती घेईल आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्ये आणि हितधारकांमध्ये सहमती निर्माण करेल असे सीतारामन यांनी नमूद केले."
"आमचे सरकार अशी आर्थिक धोरणे स्वीकारेल जी विकासाला चालना देतील आणि वाढ कायम राखतील , सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास सुलभ करेल, उत्पादकता सुधारेल, सर्वांसाठी संधी निर्माण करेल, त्यांना त्यांच्या क्षमता वाढवण्यात मदत करेल आणि गुंतवणुकीला बळ देण्यासाठी आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संसाधने निर्माण करण्यात योगदान देईल."
गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार आकारमान , क्षमता, कौशल्ये आणि नियामक आराखड्याच्या दृष्टीने वित्तीय क्षेत्र तयार करेल.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2001382)
Visitor Counter : 145
Read this release in:
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam