अर्थ मंत्रालय
आमचा युवावर्ग क्रीडा क्षेत्रात उंच भराऱ्या गाठत असल्याचा देशाला अभिमान आहे: केंद्रीय अर्थमंत्री
अर्थसंकल्पात युवावर्गासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा प्रस्ताव आहे
आमच्या तंत्रकुशल जाणकार तरुणांसाठी, हे एक सुवर्ण युग असेल: श्रीमती. निर्मला सीतारामन
Posted On:
01 FEB 2024 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ हा मंत्र अधोरेखित करत केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री,श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळी म्हणाल्या, की आमच्या युवकांनी क्रीडा क्षेत्रात नवीन उंची गाठल्याचा देशाला अभिमान वाटत आहे.
क्रीडाक्षेत्रातील युवावर्ग
आशियाई क्रीडास्पर्धांतील भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकत
त्या म्हणाल्या, "आशियाई क्रीडा क्रीडास्पर्धांतील आणि आशियाई पॅराक्रीडास्पर्धां 2023 मधील आतापर्यंतची सर्वोच्च पदकतालिका उच्च आत्मविश्वासाची पातळी दर्शवतात". आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात, केंद्रीय मंत्री असेही पुढे म्हणाल्या,की बुद्धिबळातील प्रतिभावान आणि आमचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू प्रज्ञानानंद याने 2023 मध्ये विद्यमान जागतिक चॅम्पियन मॅग्नस कार्लसनविरुद्ध कठोर लढा दिला,बुद्धिबळातील भारताच्या यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “आज भारताकडे 80 पेक्षा जास्त बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत जी संख्या 2010 पर्यंत 20 पेक्षाही कमी होती”.
तंत्रकुशल तरुणांसाठी निधी
श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना पन्नास वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह एक लाख कोटी रुपयांचा निधी आवंटीत करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा निधी दीर्घकालीन वित्तपुरवठा किंवा दीर्घ मुदतीसाठी आणि कमी किंवा शून्य व्याज दरांसह पुनश्च वित्तपुरवठा प्रदान करेल. अर्थमंत्री म्हणाल्या की, आमच्या तंत्रज्ञान जाणणाऱ्या कुशल तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल आणि त्यासाठी आमच्या तरुणाईची शक्ती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारे कार्यक्रम तयार करायला हवे आहेत.हा निधी खाजगी क्षेत्रातील नवोन्मेशाली संशोधन आणि नवसंकल्पना यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यास प्रोत्साहन देईल,यावर श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी यावर विशेष भर दिला.
* * *
M.Iyengar/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2001343)
Visitor Counter : 158
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam