अर्थ मंत्रालय
केंद्र सरकारने केली सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती
Posted On:
31 JAN 2024 12:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 31 जानेवारी 2024
नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांच्या अध्यक्षतेखाली सोळाव्या वित्त आयोगाची 31.12.2023 रोजी स्थापना करण्यात आली होती . राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर खालील सदस्यांची आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे.
1
|
अजय नारायण झा, 15 व्या वित्त आयोगाचे माजी सदस्य,आणि माजी व्यय सचिव
|
पूर्णवेळ सदस्य
|
2
|
ॲनी जॉर्ज मॅथ्यू, माजी विशेष सचिव (व्यय)
|
पूर्णवेळ सदस्य
|
3
|
डॉ. निरंजन राजाध्यक्ष, अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक
|
पूर्णवेळ सदस्य
|
4
|
डॉ. सौम्या कांती घोष, भारतीय स्टेट बँक समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार
|
अर्धवेळ सदस्य
|
आयोगाच्या कार्यविषयक संदर्भ अटी 31.12.2023 रोजी अधिसूचित करण्यात आल्या होत्या.
सोळाव्या वित्त आयोगाला 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्या शिफारशी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
(अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
Jaydevi PS/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000787)
Visitor Counter : 472