पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2024 7:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.
त्यांनी मंदिरात कंब रामायणाचे श्लोक देखील ऐकले, जिथे महान कवी कंबन यांनी प्रथम त्यांचे रामायण सर्वांसमोर सादर केले होते .
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थनेची संधी मिळाली. या मंदिराशी प्रभू श्री राम यांचा प्रदीर्घ काळापासून संबंध आहे. ज्या देवाची प्रभू श्रीरामांनीही पूजा केली, त्या देवाचा आशीर्वाद मिळाल्याबद्दल मला कृतकृत्य वाटत आहे."
पंतप्रधानांनी मंदिरात कंबा रामायणातील श्लोकही ऐकले.
"श्री रंगनाथस्वामी मंदिरात कंब रामायणाचे श्लोक ऐकणे हा अनुभव मी आयुष्यभर जतन करून ठेवेन. हे तेच मंदिर आहे जिथे महान कवी कंबन यांनी सर्वप्रथम त्यांचे रामायण सर्वांसमोर सादर केले होते, हे अधिक उल्लेखनीय आहे."
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1998212)
आगंतुक पटल : 150
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam