पंतप्रधान कार्यालय
वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
18 JAN 2024 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
"वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. या दु:खद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून कडून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान "
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997584)
Visitor Counter : 85
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam