पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी पीएम जनमन अंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता करणार जारी
पंतप्रधान पीएम-जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद
Posted On:
14 JAN 2024 1:22PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय - जी) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करतील. यावेळी, पंतप्रधान पीएम-जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी संवादही साधतील.
दुर्लक्षित घटकातील अगदी शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांच्या अंत्योदयाच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, 15 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने, विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या (पीव्हीटीजीएस) सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आले.
सुमारे 24,000 कोटी रुपयांची पीएम जनमन योजना 9 मंत्रालयांच्या माध्यमातून 11 प्रमुख उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते.विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहातील (पीव्हीटीजीएस) कुटुंबे आणि लोकवस्त्यांना सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, वीज, रस्ते आणि दूरसंचार यासारख्या मूलभूत सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करून या घटकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996003)
Visitor Counter : 309
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam