पंतप्रधान कार्यालय
नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा
स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून केले अभिवादन
Posted On:
12 JAN 2024 3:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. श्रीराम कुंड येथेही त्यांनी दर्शन घेऊन पूजा केली. पंतप्रधानांनी, स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
नाशिकमध्ये आज परंपरा आणि तंत्रज्ञानाचा विलक्षण संगम पाहायला मिळाला. पंतप्रधानांनी महाकाव्य रामायणातील कथा, यातील एका भागाचे ‘युद्धकांड’चे श्रवण केले. यात भगवान राम अयोध्येला परत येण्याचे वर्णन आहे. याचे सादरीकरण मराठीत होते आणि पंतप्रधानांनी एआय भाषांतराद्वारे ते हिंदी भाषेतून ऐकले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :
''नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात प्रार्थना केली. येथील दैवी वातावरणामुळे धन्य वाटत आहे. ईश्वरी शक्तीपुढे अत्यंत विनीत करणारा आणि आध्यात्मिक अनुभव. मी देशवासियांच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी प्रार्थना केली.''
"नाशिकच्या रामकुंडावरील पूजेत भाग घेतला."
“श्री काळाराम मंदिरात, संत एकनाथजी यांनी मराठीत लिहिलेल्या भावार्थ रामायणातील ओव्यांच्या श्रवणातून नितांत सुंदर अनुभूती घेतली, विजय प्राप्त करून प्रभू श्री राम अयोध्येला परत येण्याचे सुंदर वर्णन ऐकले. भक्ती आणि इतिहासाचा प्रतिध्वनी असलेले हे पठण, एक विशेष अनुभव होता.”
नाशिक येथे स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. त्यांचे कालातीत विचार आणि दूरदृष्टी आम्हाला सतत प्रेरणा देत राहते.”
***
S.Bedekar/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1995633)
Visitor Counter : 156
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam