पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एक्सपोसॅट उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

प्रविष्टि तिथि: 01 JAN 2024 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2024

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.

भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल त्यांनी अंतराळ समुदायाचे तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"वर्ष 2024 ची दमदार सुरुवात केल्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांना धन्यवाद! हे प्रक्षेपण अवकाश क्षेत्रासाठी एक संस्मरणीय बाब असून त्याद्वारे या क्षेत्रात भारताचे प्राबल्य वाढेल. भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे  आणि संपूर्ण अंतराळ समुदायाचे अभिनंदन."

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1992122) आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam