पंतप्रधान कार्यालय
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 ने अंतर्गत सजावटीसाठी जागतिक विशेष पारितोषिक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी बंगळुरूकरांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2023 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2023
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 ने विमानतळ श्रेणीत अंतर्गत सजावटीसाठी वर्ष 2023 चे जागतिक विशेष पारितोषिक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरूवासीयांचे अभिनंदन केले.
गेल्या वर्षी या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनाची छायाचित्रे पंतप्रधानांनी सामायिक केली होती.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"एक प्रशंसनीय कामगिरी! बंगळुरूवासीयांचे अभिनंदन.
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 हे केवळ बंगळुरू या चैतन्यपूर्ण शहराचे प्रवेशद्वार नाही तर वास्तुशिल्पाच्या तेजाचे प्रतिक देखील आहे. ही कामगिरी म्हणजे कलात्मक सौंदर्याची जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांबरोबर सांगड घालण्यात देशाच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिबिंब आहे.
गेल्या वर्षी झालेल्या या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनाची ही एक झलक. ”
M.Pange/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1989949)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam