पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायल-हमास संघर्षाविषयी ताज्या घडामोडींची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली
सागरी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत उभय नेत्यांनी व्यक्त केली चिंता
संघर्षावर चर्चा- संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा तसेच मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करण्याच्या गरजेचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुनरुच्चार
Posted On:
19 DEC 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली.
पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायल-हमास संघर्षाविषयीच्या ताज्या घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
दोन्ही नेत्यांनी सागरी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
या संघर्षामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मानवतावादी मदत सुरु ठेवण्याच्या गरजेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरूच्चार केला. संघर्ष लवकर संपुष्टात यावा आणि या प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने चर्चेने, मुत्सद्देगिरीने तोडगा काढण्यात यावा तसेच सर्व ओलिसांची मुक्तता करण्यात यावी, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला.
उभय नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याविषयी सहमती व्यक्त केली.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1988465)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam