मंत्रिमंडळ
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात डिजिटलीकरण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याविषयीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2023 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारताच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच सौदी अरेबियाच्या संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयादरम्यान, 18 ऑगस्ट 2023 रोजी डिजिटलीकरण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या क्षेत्रात झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
या सामंजस्य कराराचा उद्देश, डिजिटलीकरण, इलेक्ट्रॉनिक उत्पादन, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा, ई-आरोग्य आणि ई-शिक्षण या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे, डिजिटल नवोन्मेषातील संशोधनात भागीदारीला प्रोत्साहन देणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोट्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि ब्लॉक चेन इत्यादी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आहे. या सामंजस्य करारांतर्गत डिजिटलीकरण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात सहकार्यासाठी एक आराखडा तयार केला जाईल ज्याद्वारे भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात भागीदारी निर्माण होऊ शकेल.
डिजिटायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ई-शिक्षण आणि आदानप्रदान कार्यक्रमाद्वारे अभिनव प्रशिक्षण आणि विकासाच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि क्षमता वाढविण्यासाठी आणि उच्च कुशल माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे, छोट्या आणि मध्यम उद्योगांना मजबूत करणे आणि स्टार्ट-अप परिसंस्था मजबूत करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे, जे अप्रत्यक्षपणे उभय देशांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतील.
या सामंजस्य कराराअंतर्गत, आत्मनिर्भर भारताचे महत्वाचे उद्दिष्ट असलेल्या, एकत्रित उपक्रमांद्वारे डिजिटलीकरण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या क्षेत्रात, सहकार्याला प्रोत्साहन मिळेल.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1986976)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam