युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन
Posted On:
10 DEC 2023 6:48PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली येथे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन होणार आहे. 10 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत तीन ठिकाणी होणाऱ्या या क्रिडा स्पर्धेत देशातील 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्ड चे 1400 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील खाशाबा जाधव इनडोअर हॉलमध्ये होणार आहे. या समारंभात दिल्ली पोलिसांचा बँड एक भव्य कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यानंतर 'वुई आर वन' समुहाचा नर्तक चमू 'मिट्टी में मिल जावा' आणि 'वंदे मातरम' या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे.
उद्घाटन समारंभात क्रीडा स्पर्धेच्या विशेष गीताच्या सादरीकरणानंतर स्पर्धेची सुरुवात होईल, तर या नंतर सादर केले जाणारे ‘इव्हॉल्यूशन ऑफ पॅरा गेम्स’ या संकल्पनेवर आधारित एलईडी नृत्य सादरीकरण प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालेल. उद्घाटन समारंभात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी देखील एक विशेष कलाविष्कार सादर करणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप ‘युनायटेड बाय स्पोर्ट्स’ च्या सादरीकरणाने होईल. यावेळी सर्व सहभागींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला विशेष संदेशही असेल.
सर्व दिव्यांग क्रीडापटूंना सक्षम बनवणे हा खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या आयोजनामागचा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे. शीतल देवी, भाविना पटेल, अशोक, प्रमोद भगत यांसारखे भारतातील काही अव्वल आंतरराष्ट्रीय स्टार दिव्यांग क्रीडापटू सहभागी होणार आहेत.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984791)
Visitor Counter : 117