पंतप्रधान कार्यालय
वर्ष 2023-24 मध्ये पॅकेजिंग कामात ज्यूटचा वापर अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत
या निर्णयामुळे ज्यूट क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्यास हातभार लागेल - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2023 10:12PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2023-24 मध्ये पॅकेजिंग संबंधित कामात ज्यूटचा वापर अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या निर्णयामुळे ज्यूट क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. आपल्या कारागिरांना आणि शेतकऱ्यांना देखील या निर्णयामुळे एक मोठे प्रोत्साहन मिळेल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
या निर्णयाबद्दल अधिक तपशील येथे पाहू शकता :
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1984208
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या X वरील पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“हा निर्णय ज्यूट क्षेत्राला नवसंजीवनी देण्यास हातभार लावेल! या निर्णयामुळे आपल्या कारागिरांना आणि शेतकर्यांना देखील एक मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.”
***
S.Tupe/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1984755)
आगंतुक पटल : 101
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam