पंतप्रधान कार्यालय

इंडिया आर्ट,अर्कीटेक्चर अँड डिझाईन बिनाले अर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक सारखे मंच आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी आणि त्याचे संगोपन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत: पंतप्रधान

Posted On: 08 DEC 2023 9:38PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित इंडिया आर्ट,अर्कीटेक्चर अँड डिझाईन बिनालेअर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रमाची क्षणचित्रे सामायिक केली.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

“आज इंडिया आर्ट,अर्कीटेक्चर अँड डिझाईन बिनाले ला भेट देऊन खूप आनंद झाला. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी आणि त्याची जोपासना करण्यासाठी असे मंच महत्त्वाचे आहेत. ते सर्जनशील मनांना एकत्र येण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि भारतीय परंपरांचा समृद्ध वारसा जिवंत ठेवण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करतात.”

***

JPS/VJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984356) Visitor Counter : 94