पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नौदल दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
04 DEC 2023 12:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“नौदल दिनानिमित्त, भारतीय नौदलातील सर्व जवानांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या समुद्राचे रक्षण करण्याप्रति त्यांची वचनबद्धता, ही कर्तव्याप्रती त्यांची अतूट समर्पित वृत्ती आणि देशाप्रति प्रेमाचा दाखला आहे. प्रत्येक परिस्थितीत त्यांची भावना आणि संकल्प अटल राहतो. त्यांच्या सेवा आणि बलिदानासाठी आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.
आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. या ठिकाणाचे छत्रपती शिवाजी महाराजांशी जवळचे नाते आहे, एक मजबूत नौदल उभारण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.”
***
Jaydevi PS/Sushama/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1982254)
Visitor Counter : 156
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam