पंतप्रधान कार्यालय
कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट
Posted On:
01 DEC 2023 9:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई मधील कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2023 रोजी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट घेतली.
व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ परिषदेत उझबेकिस्तानच्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मिर्जिओयेव यांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी आरोग्य, शिक्षण, औषध निर्माण आणि पारंपारिक वैद्यक क्षेत्रातील त्यांचे व्यापक द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर विचार विनिमय केला.
पंतप्रधानांनी उझबेकिस्तानबरोबरची विकास भागीदारी वाढवण्यासाठी भारताच्या सहयोगाचे आश्वासनही दिले.
***
MI/RAgashe/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981838)
Visitor Counter : 94
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam