पंतप्रधान कार्यालय

भारताचे राजनैतिक प्रयत्न आणि प्रादेशिक संबंध , जागतिक स्तरावर भारताचे ‘एक आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम देश’ असे चित्र निर्माण करत आहे: पंतप्रधान

Posted On: 17 NOV 2023 3:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 या वर्षातल्या भारताच्या कामगिरीचे वर्णन करणारे चित्रण करणारा एक लेख आज सोशल मिडियावर सामाईक केला आहे. यात भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची यशस्वी कारकीर्द आणि चंद्रयान अभियान, यांसारख्या कामगिरीसह, कोविड-19 नंतर भारताने पुन्हा उभारी घेत, केलेली वृद्धी यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी हा लेख लिहिला आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

"परराष्ट्र व्यवहार मंत्री @DrSJaishankar's यांचा लेख 2023 मधल्या भारताच्या कामगिरीचे दर्शन घडवणारा असून  यात जी 20 अध्यक्षपद आणि चंद्रयान मिशनसह, भारताने कोविड नंतर पुन्हा उभारी घेत मिळवलेली वृद्धी, यावर प्रकाश टाकणारा आहे. 

या लेखात, भारताचे राजनैतिक प्रयत्न, प्रादेशिक संबंध अधोरेखित करत, जागतिक पातळीवर आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भारताचे चित्र निर्माण करणारे आहे.

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1977606) Visitor Counter : 95