सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते पाच दिवसांच्या 'दिवाळी उत्सवाचे' उद्घाटन


'वोकल फॉर लोकल' ही या वर्षीची संकल्पना

11 नोव्हेंबरपर्यंत खादी उत्पादनांवर 20% विशेष सवलत उपलब्ध

Posted On: 08 NOV 2023 4:08PM by PIB Mumbai

 

'मन की बात'च्या 106 व्या भागात जनतेला संबोधित करताना, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सणासुदीच्या दिवसांत आणि विशेष प्रसंगी स्थानिक पातळीवरील उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली वोकल फॉर लोकलया भावनेला समर्थन देत काल ग्रामशिल्प, या नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे पाच दिवसांच्या दिवाळी उत्सवया खादी प्रदर्शनाचे उदघाटन केले.

पंतप्रधानांच्या या आवाहनाशी दिल्लीतील लोकांना जोडण्यासाठी 'दिवाळी उत्सवा'दरम्यान स्थानिक उत्पादनांची एक विशेष श्रेणी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून स्थानिक पातळीवरील अधिकाधिक उत्पादने सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील. जेव्हा खादी उत्पादने विकली जातात तेव्हा ते ग्रामीण भारतात काम करणारे कारागिर आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होतात.

Image

या प्रसंगी मनोज कुमार म्हणाले, “ प्रत्येकाच्या  खिशाला परवडतील अशा स्थानिक उत्पादनांची विस्तृत श्रेणी खादीप्रेमींसाठी येथे उपलब्ध आहे. दिल्लीतील कुंभारांनी बनवलेल्या मातीच्या दिव्यांसारख्या उत्पादनांपासून ते 50 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतच्या लक्ष्मी आणि गणेशाच्या सुंदर मूर्ती, हस्तकलेची मातीची मंदिरे, ग्रामोद्योग आणि पीएमईजीपी युनिट्सद्वारे भरड तृणधान्यांपासून बनवलेली उत्पादने, मेणबत्त्या,अगरबत्ती, खादी कारागिरांनी आणि डिझायनर्सनी तयार केलेली

खादीची जाकिटे, यांसह आधुनिक आकर्षक खादी वस्त्रांची विशेष श्रेणी देखील उपलब्ध आहे.

दीपोत्सव आणि आत्मनिर्भर भारत या भावनेला साजरे करत, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे असलेल्या खादी ग्रामोद्योग भवनात, खादी उत्पादनांवर 20% आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर 10% ही विशेष सवलत दिली जात आहे.

या उदघाटन समारंभाला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री विनित कुमार यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

***

R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975684) Visitor Counter : 117