पंतप्रधान कार्यालय
नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.
Posted On:
04 NOV 2023 10:29AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती सर्व मदत करेल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या दुर्घटनेतील जखमीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे,
"नेपाळमधील भूकंपामुळे झालेली जीवित हानी आणि नुकसान यामुळे तीव्र दुःख झाले आहे. नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा आहे आणि शक्य असेल ती सर्व मदत करण्यासाठी सज्ज आहे. या दुर्घटनेत आपले आप्तस्वकीय गमावलेल्या कुटुंबियांप्रति सहवेदना तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशा शुभकामना @cmprachanda.
***
MI/Vijaya S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974647)
Visitor Counter : 135
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam