पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या अलौकिक कामगिरीची पंतप्रधानांकडून प्रशंसा

Posted On: 28 OCT 2023 11:13PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या 111 पदकांच्या अलौकिक कामगिरीची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या अतूट समर्पण आणि अदम्य सहसाचेही कौतुक केले.

 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या अलौकिक कामगिरीने संपूर्ण देश रोमांचित झाला आहे! देशासाठी विक्रमी 111 पदक जिंकल्याबद्दल मी अलौकिक कामगिरी करणाऱ्या आपल्या खेळाडूंचे अभिनंदन करतो. हे यश आपल्या खेळाडूंच्या अतूट समर्पण आणि अदम्य सहसाचे प्रतीक आहे.”

***

SonalT/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972756) Visitor Counter : 62