पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी टेक चंद महलावत याचे केले अभिनंदन

Posted On: 28 OCT 2023 8:32PM by PIB Mumbai

 

हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक -F55 प्रकारात आज कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेक चंद महलावत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

महलावतने दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेचे दर्शन घडवले असून देशाला अभिमानाने भारून टाकले आहे, अशा शब्दात त्यांनी महलावत याच्या कामगिरीचे कौतुक केले. 

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"पुरुषांच्या भालाफेक-F55 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल टेक चंद महलावत यांचे खूप खूप अभिनंदन.

या कामगिरीतून त्यांचा दृढनिश्चय आणि उत्कृष्टता दिसून येते आणि याचा आपल्या देशाला खूप अभिमान वाटत आहे."

***

M.Pange/S.Mukhedar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972680) Visitor Counter : 94