पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय-S7 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सुयश जाधवचे केले अभिनंदन

Posted On: 27 OCT 2023 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

हँगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, आज पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय- S7 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल सुयश जाधवचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय - S7 स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून कांस्यपदक पटकावल्याबद्दल सुयश जाधवचे खूप खूप अभिनंदन. चिकाटी आणि उत्कटतेमुळे यश प्राप्त होऊ शकते हे त्याने दाखवून दिले आहे. भारत अतिव आनंदी  झाला आहे."

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972283) Visitor Counter : 67